Share

कोरोनाला वेळीच रोखता आलं असतं, पण…; आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी ओढले ताशेरे

Published On: 

दिल्ली : गेल्यावर्षी कोरोना महामारीने भारतासह जगभरात थैमान घातलं होतं. भारतात यावर्षी देखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या रोगाचे परिणाम जगभरात अजूनही जाणवत असून येत्या काळात देखील गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान या रोगाला वेळीच रोखता आलं असतं, मात्र दुर्लक्ष आणि वेळकाढूपणामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याच मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जगभरात ३३ लाखांहून अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला असून याला सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे ताशेरे तज्ज्ञांच्या गटाने ओढले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणावर देखील या गटाने परखड टीका केली आहे. महत्वाचं म्हणजे, WHO नेच नेमलेल्या दि इंडिपेंडंट पॅनल फॉर पँडेमिक प्रिपेर्डनेस अँड रिस्पॉन्स अर्थात IPPPR या गटाने ही निरीक्षणं नोंदवली आहेत. याबाबतटाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं आहे.

‘जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतरही अनेक देशांनी चीनमधल्या वुहानमध्ये झालेल्या सुरुवातीच्या करोना उद्रेकाकडे दुर्लक्ष केलं. त्याकडे लक्ष देऊन तातडीने पावलं उचलण्यात हे देश कमी पडले आणि त्याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी २०२०मध्ये करोना जगभरात पसरला. यासंदर्भातल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्यात अनेक देश कमी पडले,’ अशा शब्दांत या तज्ज्ञांनी जगभरातील सत्ताधाऱ्यांना चपराक लगावली आहे.

यासोबतच, ‘निरनिराळ्या देशांमधील सरकारांना लोकांचं संरक्षण करण्यात अपयश आलं असून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांनी जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास हातभारच लावला,’ असं देखील सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!