Share

Corona Breaking News: आजही राज्याचा आकडा ९ हजार पार!

Published On: 

मुंबई: राज्यात गेले ४ महिने कोरोनाने हाहाकार माजवला असून मुंबई, पुण्यासारख्या शहरातील कोरोना आटोक्यात येत असला तरी राज्यातील नव्याने कोरोना संसर्गित होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे, एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढणे हे जरी दिलासादायक असले, तरी नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होणे गरजेचे आहे.

आज, महाराष्ट्रात ९ हजार १८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २९३ रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही ५ लाख २४ हजार ५१३ इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४७ हजार ७३५ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत १८ हजार ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६८.३३ टक्के झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली .

आयपीएलची टशन रंगणार; अधिकृत परवानगी मिळाली

पुण्यात आज केवळ ७६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून गेल्या काही दिवसात २ हजार पार असलेला रोजचा आकडा हा १ हजारच्या आत आल्याने, मधल्या काळात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन केल्याचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. तर एकूण रुग्णसंख्या हि ६६ हजार ७२७ झाले असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे सांगितले.

शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!