🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाउनही घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली असून यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका कनिका कपूरनंतर आता प्रसिद्ध अभिनेता किरण कुमारला कोरोनाची लागण झाली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलत असताना त्यांनी स्वत: ही माहिती दिली. “मी १४ मे रोजी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आलेल्या रिपोर्टसमध्ये मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र माझ्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसून आली नव्हती. ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास कोणतीही समस्या मला जाणवत नव्हती. मी पूर्णपणे व्यवस्थित होतो. परंतु तरी मला करोना झाला आहे.त्यामुळे मी घरातच क्वारंटाइन झालो आहे. माझं घरं दुमजली असल्यामुळे मला घरात राहण्यास कोणतीच अडचण येत नाहीये”, असं किरण कुमार म्हणाले.
#corona : अंतिम वर्षाच्या परीक्षांचे पुणे विद्यापीठाचे आराखडे तयार, ‘असे’ असणार परीक्षेचे स्वरूप
पुढे ते म्हणतात, “सध्या माझी प्रकृती ठीक आहे. माझी पत्नी आणि मुलं घराच्या पहिल्या माळ्यावर राहत आहेत, आणि मी टॉप फ्लोअरवर एकटा राहत आहे. मी आता २६ किंवा २७ तारखेला पुन्हा एकदा करोना चाचणी करणार आहे”.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख २५ हजार १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ हजार ७२० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ५१ हजार ७८३ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.
जाणून घ्या, हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घोषित करताना नेमकं काय म्हटलं ?
#Coronavirus : ‘अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद कराव्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
