सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. विशेष म्हणजे फळबागा असलेल्या शेतकऱ्यांचे या दिवसांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या बागेतील फळ फेकून देण्याची वेळ आली आहे. मात्र असे असतानाचं सांगलीतील हर्षदा चव्हाण यांनी एक टन द्राक्ष रस्त्याच्या बाजूला ठेवली आहेत. जेणेकरून ही द्राक्ष रस्त्यावरील जनावरांना आणि बेघर असणाऱ्या काही जणांना खाता येतील, यासाठी चव्हाण यांनी ही द्राक्ष रस्त्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला.
सांगलीतील ही द्राक्ष प्रसिध्द असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये याला मोठी मागणी असते. मात्र सध्या लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवर काही निर्बंध असल्याने हा माल जागेवर पडून आहे. ही द्राक्ष वाळवून यातून मनुके काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ही द्राक्ष सडून जात होती, असे चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान गेलं वर्ष देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक होत. अवकाळी पावसाने अनेक द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. राज्यातील द्राक्षाची वार्षिक उलाढाल ही 2500 ते 3000 कोटी एवढी आहे. मात्र या कोरोनामुळे यावर 40% फटका बसला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष (नाशिक) रवींद्र बोराडे यांनी दिली.
द्राक्ष लागवडीखालील राज्यात अंदाजे तीन लाख हेक्टर शेती असून त्यापैकी नाशिक पट्ट्या एकूण उत्पादनापैकी 80% उत्पादन होते. तर उरलेले 20% पिक हे सांगली, पुणे, आणि सोलापूर येते घेतले जाते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

