Share

कोरेगाव-भीमा प्रकरणी गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ९ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई देणार आहे.  तसेच हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा विधिमंडळात केली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

कोरेगाव-भीमा बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत एकूण ५८ गुन्हे दाखल झाले असून, १६२ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय, जखमींमध्ये ६० पोलीस आणि ५८ नागरिकांचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण१७ अट्रोसिटी आणि ६०० हून अधिक गुन्हे दाखल झाले. त्यात ११९९ आरोपींना अटक करण्यात आली असून, २ हजार ५३ व्यक्तींवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली.” सदर प्रकरणात ९ कोटी ४५ लाखांची नुकसान झाले. त्याची भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला.

संभाजी भिडे यांच्यावर बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी टाळले. मात्र मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार ताब्यात घेणार असून, त्याची सगळी व्यवस्था राज्य सरकार पाहणार आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!