Share

मोठी बातमी : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी 7 वाजता त्यांना नवी दिल्लीतील श्री गंगा राम हॉस्पिटल येथे नियमित चाचण्या आणि अधिक तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. श्री गंगा राम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ चेस्ट अँड रेजिटलरी मेडिसिन विभागाच्या अध्यक्षा डॉ अरुप कुमार बसू आणि त्यांच्या टीमचा देखरेखी खाली आहेत .तर त्या रुटीन चेक-अपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच देशातील करोना परिस्थिती, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!