नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येवू लागला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच सोनिया गांधींवर अधिक भार टाकणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाने कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत थरुर यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष दिशाहीन असल्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला पक्षाने वेग देण्याची गरज असल्याचं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष केल्यानंतर आपण त्याचे स्वागत केले होते. पण त्यांनी पुढेही ही जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा कऱणे योग्य नाही. तसंच काँग्रेस पक्ष दीशाहिन आणि लक्ष्यहिन असल्याची भावना मीडिया लोकांमध्ये वाढवत आहे, यासाठी आता पूर्णवेळ अध्यक्ष असण्याची गरज थरुर यांनी व्यक्त केली आहे.
एवढेच नाहीतर अध्यक्षपदाची निवड निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेतली तर अध्यक्षांची विश्वासार्हता वाढेल आणि संघटनात्मक स्तरावर पक्षाला नवी उभारी मिळू शकेल’ असेही थरुर यांनी म्हटले आहे. पक्षाचं नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे क्षमता आणि योग्यता आहे. मात्र जर त्यांना अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची गरज आहे,” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

