Share

Congress | रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Congress | मुंबई : राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर वाद जोरदार पेटला आहे. यामध्ये सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी देखील उडी गेतली आहे. यावेळी त्यांनी पंडित नेहरु (Pandit Nehru) यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केला आहे. यावर काँग्रेस (Congress) नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) आणि विलास मुत्तेमवर यांनी पलटवार केला आहे.

शहीद भगत सिंग जेलमध्ये असताना त्यांना कोणी भेटायला गेलं नव्हतं, फक्त नेहरु त्यांना भेटायला गेले होते, त्यांची वकीली देखील नेहरुंनीच केली होती, असं उल्हास पवार म्हणाले. तसेच, स्वातंत्र्याच्या संघर्षाबाबत बोलणाऱ्यांपैकी यांच्यातलं कोणही सहभागी नव्हता, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

बोलायला झालं तर खूप गोष्टी आहेत, मात्र, त्यांना काही तथ्य नाही, असं विलास मुत्तेमवर म्हणाले. त्यामुळे काहीही बोलाल, लोकं विश्वास ठेवतील, असं नाही, असं देखील मुत्तेमवर म्हणाले.

एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली, असा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. माऊंट बॅटन यांच्या पत्नीसोबतचे नेहरुंचे पत्र व्यवहार समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यात केला जात आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात काल गुरुवारी ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते. बाळासाहेबांची शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!