मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाच्या शपथविधीवेळी झालेला वाद ताजा असतानाच आता यामध्ये आणखी नवी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसावे लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम एवढीच महत्त्वाची – संजय राऊत
कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी या सगळ्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत असल्याचे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.
शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे.
जाहीर निषेध!— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 23, 2020
दरम्यान, यावर राज्यात राजकारण पेटलं असताना उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला. माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता.”
“बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे. शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?”, असा प्रश्नही यावेळी उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला.
सभापती व्यंकय्या नायडू यांनी जे राज्यघटनेत नाही त्यावर फक्त आक्षेप घेतला – उदयनराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

