Share

कॉंग्रेसला जबर धक्का , राजेंद्र दर्डांनी दिला राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र दर्डा काँग्रेसवर नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांनी पक्षाच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला पाठविला आहे. राजेंद्र दर्डा हे गेल्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसपासून दूर झाले आहेत.

काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. राजेंद्र दर्डा सलग 15 वर्ष आमदार राहिले आहेत, तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदही भूषवली आहेत.

राजेंद्र दर्डा ‘लोकमत’सारख्या मोठ्या दैनिकाचे मालक देखील आहेत. राजेंद्र दर्डा यांनी प्रसारमाध्यम आणि संपर्क या कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेससमोरील समस्या आणखी वाढली आहे. वैयक्तिक अडचण असल्यामुळे आपण या कमिटीतून बाहेर पडत असल्याचं राजेंद्र दर्डा यांनी सांगितलं आहे. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

महत्वाच्या बताम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176065159040626690?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176065004245700608?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176062760129454080?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!