Share

आयएनएक्स घोटाळा : जामीन नाकारताच चिदंबरम झाले अदृश्य

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात सर्वोच्च न्याययालयात धाव घेणाऱ्या चिदंबरम यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला असून सरन्यायाधीशांकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आजच यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

आयएनएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर, काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला ते कुठंच सापडले नाहीत. त्यामुळे दोन तासात सीबीआयपुढं हजर व्हा, अशी नोटीस त्यांच्या घरावर चिकटवून या पथकाला परत यावं लागलं. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मधे आयएनएक्स या माध्यमसमूहाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी स्वीकारण्यासाठी परवानगी देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

‘आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ‘बेपत्ता’ झाले असून, त्यांचा मोबाइलही स्वीच ऑफ आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’) पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!