मुंबई : विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चक्क आठवडा उलटून गेला आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत.
गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची मोट बांधताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांना खूप प्रयत्न करावे लागले होते. मात्र, अनेक बैठका, चर्चेनंतर त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले होते. मंत्रीमंडळ वाटपावरूनही बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते नाराज आहेत.
पवारांच्या चक्रव्यूहात अडकले शेट्टी? चौफेर टीकेनंतर फेसबुक पोस्टमधून केला मोठा खुलासा
विधान परिषदेच्या 9 जागांवरून काँग्रेस नाराज झाला होता. तिसरा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. ९ जागांसाठी ही निवड़णूक होणार होती. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली होती. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. आता पुन्हा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच राज्य सरकारमध्ये नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची ओरड काँग्रेस नेते मारत आहेत.
दरम्यान, काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील कोरोना बाधितांसाठी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
