Share

मोदी सरकारचे अपयश लोकांसमोर आणण्यात काँग्रेस कमी पडली; पृथ्वीराज चव्हाणांची कबुली

Published On: 

मुंबई : ‘नोटाबंदी असो की जीएसटीची अंमलबजावणी, कोणाशीही योग्य सल्लामसलत न करता पंतप्रधान मोदी यांनी मनमानीपणे निर्णय घेतले. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोल होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘विविध आर्थिक आघाडय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले. मात्र मोदी सरकारचे हे अपयश लोकांसमोर आणण्यात किं वा त्या विरोधात जनमत तयार करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडली, असं चव्हाण म्हणाले.

तसेच ‘नव्या दमाचे तरुण त्यासाठी पक्षात यायला हवेत. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्षात विचार सुरू आहे. काँग्रेसला सत्तेची सवय असल्याने राज्यात गेल्या पाच वर्षांत आम्ही विरोधी पक्ष म्हणून आक्र मकपणे काम करू शकलो नाही, असं चव्हाण म्हणाले.

दरम्यान, ‘माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम नियमितपणे मोदी सरकारच्या कारभारावर वृत्तपत्रांमधील लेखांमधून मुद्देसूद मांडणी करून टीका करतात, त्याचप्रमाणे देशभरात ठिकठिकाणी जनतेच्या स्थानिक भाषेतून मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे,’ असं मत चव्हाण यांनी मांडले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!