Share

पंतप्रधान मोदींसंबंधीत ‘ते’ ट्वीट काँग्रेसने केले डिलीट

Published On: 

नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी केलेल्या एका ट्वीटमुळे सध्या कर्नाटक काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी ट्वीट करत सोशल मीडिया टीमला हे ट्वीट डिलीट करण्यास सांगितले असून यामध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

‘काँग्रेसने शाळा बांधल्या पण मोदी कधी शिक्षण घेण्यासाठी गेले नाहीत. काँग्रेसने प्रौढांसाठी शिकण्यासाठी योजनाही उभारल्या, मोदी तिथेही शिकले नाहीत. भीक मागण्यास मनाई असूनही उपजीविकेसाठी भीक मागण्याची निवड करणारे लोक आज नागरिकांना भिकारी होण्याकडे ढकलत आहेत. ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला भोगावं लागत आहे,’अशी टीका काँग्रेसने केली होती.

दरम्यान, यासंदर्भात डी शिवकुमार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे यावर माझा विश्वास आहे’. तसेच सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरुन केलेले असंसदीय ट्वीट खेदजनक असून काढण्यात येत आहे’, असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!