Share

भाजपने कलम ३७० हटवत काश्मीरला बरबाद केलं, मत मिळवण्यासाठीचं काश्मीरचे तुकडे – कॉंग्रेस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सत्तेच्या नशेत असणाऱ्या भाजपने सीमेवर असणाऱ्या राज्याला अस्थिर केले आहे, आजचा दिवस हिंदुस्तानच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिला जाईल, भाजपने कलम ३७० हटवत काश्मीरला बरबाद केलं असून केवळ मत मिळवण्यासाठीचं काश्मीरचे तुकडे करण्यात आल्याची जळजळीत टीका कॉंग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी दिली आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर आझाद बोलत होते.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली, शहा यांनी सभागृहात संसोधन विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला.

दरम्यान, आमचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण आज भाजपाने राज्यघटनेची हत्या केली, हिंदुस्तानच्या इतिहासात आजचा दिवस काळ्या अक्षराने लिहिले जाईल, अशी प्रतिक्रिया गुलाब नबी आझाद यांनी दिली आहे.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा, म्हणत सरकारचे समर्थन केले केले आहे. मित शहा यांनी मांडलेल्या विधेयकावर बोलत असताना संजय राऊत म्हणाले कि, मोदी सरकारने हिम्मत दाखवली आहे. आजचा दिवस स्वातंत्र्य दिनासारखाच आहे, कलम 370 हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत, ज्यांनी 70 वर्ष काश्मीर धगधगतं ठेवलं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे.

भारतासोबत आस्था असणाऱ्या लोकांना बाजूला करून ३७० हटवण्याचा निर्णय – पवार

सरकारकडून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे, मात्र दुसरीकडे विरोधकांनी सरकार मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. आझाद काश्मीरची भूमिका मांडणारे काही लोक तिथे होते, मात्र मेहबूबा मुफ्ती, गुलाबनबी आझाद, फारूक अब्दुल्ला यांच्या सारखे भारताशी निष्ठा असणारे काही लोक काश्मीरात आहेत. हे सर्वजण अतिरेकी भूमिका घेणाऱ्यां विरोधात भारताची भूमिका अखंडपणे मांडत आले आहेत, मात्र भारतासोबत निष्ठा असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार

जुम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवतानाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरसह लडाख हे केंद्रशासित प्रदेश असणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम हटवण्याचे विधेयक मांडताच विरोधी पक्षांनी थयथयाट केला आहे.

घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे

१) काश्मिरसाठीची वेगळी घटना व झेंडा संपुष्टात

२) काश्मिरात मालमत्ता विकत घेण्याचा आता भारतीयांना अधिकार

३) काश्मिरी नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व यापुढे संपुष्टात

४) भारतीय संसद यापुढे काश्मिरसाठीही सर्वोच्च ठरणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!