Share

मिठाईवाल्यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत हुज्जत, लाखाचे बिल थकवूनही धमकी

Published On: 

औरंगाबाद : एक लाखाचे बिल थकल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याचा गळा पकडून मिठाई व्यावसायिकाने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अधिकाऱ्याने वेदांतनगर पोलिसांत तक्रार देताच व्यावसायिक डुंगरसिंग हिरालाल राजपुरोहित व त्याचा भाऊ राजूसिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राजूसिंगला अटक करण्यात आली. रेल्वेस्थानक रोडवरील मधुर मिलन या दुकानात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.

महावितरणचे सहायक अभियंता सुनील सातदिवे यांच्या फिर्यादीनुसार, रेल्वेस्टेशन रोडवरील सिद्धार्थ आर्केड इमारतीमध्ये तळमजल्यावर मिठाईचे दुकान आहे. या दुकानात सच्चाई फुड्स प्रॉडक्ट नावाने डुंगरसिंग राजपुरोहित यांचे वीज मीटर आहे. या ग्राहकाकडे ८५ हजार ९२४ रुपये थकबाकी असून, चालू बिल १६ हजार ७२४ रुपये असे एकूण १ लाख २ हजार ८६० रुपये वीज बिल थकित आहे.

वारंवार सूचना केल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी ५० हजारांचा धनादेश दिला, मात्र तो वटलाच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डुंगरसिंगशी संपर्क साधून वीज बिल भरण्यास सांगितले. शनिवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, सहायक अभियंता सुनील सातदिवे व वरिष्ठ तंत्रज्ञ अर्जुन वैद्य दुकानावर गेले. तेव्हा दोन्ही भावांनी न वटलेला धनादेश परत देण्याची मागणी केली. तो पुढील मंगळवारपर्यंत देतो, असे सांगितले.

यावरून अधिकारी आणि राजपुरोहित यांच्या वादग्रस्त चर्चा झाली. तेव्हा डुंगरसिंग यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचा भाऊ राजूसिंग याने थेट अधिकाऱ्याची गचांडीच पकडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात निरीक्षक सचिन सानप यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!