सातारा : कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांवर देखील अमानुषपणे पोलीस लाठीचार्ज करत आहे. धक्कादायक बाब म्हणजेलातूर आणि औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची चौकशी करूनच त्यांना शिक्षा करावी असं आवाहन पोलीस प्रशासनाला केलं आहे.
उदयनराजे भोसले यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
आज आपल्या महाराष्ट्रातील पोलीस बांधव तमाम महाराष्ट्र वासीयांच्या सुरक्षतेसाठी दिवस रात्र रस्त्यावर थांबून आपले आद्यकर्तव्य पार पाडत आहेत. परंतु काही दिवसांपासून लोकांना मारहाणीच्या घटना झालेल्या आपल्याला दिसत आहेत काही लोक कायदा मोडतात त्यांच्या बाबतीत जर ते अस करत असतील तर ते योग्य आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे पण प्रत्येकाला एकाच मापात मोजायला जमणार नाही सर्वसामान्य जनतेला पोलीसांकडून विनाकारण अजिबात त्रास होऊ नये या मताचा मी आहे.
पोलीस प्रशासनाला आमची अशी मागणी राहील की रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची चौकशी करूनच त्यांना वागणूक मिळावी. भाजीपाला, किराणा, दुध, मेडिकल मध्ये जायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य पार पाडावे.
सर्व जिल्ह्यांमध्ये हेच घडतेय सामान्य माणूस आहे तो कोणी गुन्हेगार नाही. इतक मारणे पण योग्य नाही की त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. कायदा मोडून लोक रस्त्यावर येत असतील तर त्यांना तुमच्या भाषेत उत्तर द्यायला तुम्ही समर्थ आहातच याबद्दल मात्र आम्हाला शंका नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

