Share

मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करा; पाटलांचे आवाहन

Published On: 

मुंबई : कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं.

याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी केलेल्या आवाहनाची पुनरावृत्ती केली. पण, मोकळ्या परिसरात येऊन भारतमातेचे स्मरण करण्यासाठी एकजूटीने या, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1245944428084092930?s=20

पुढे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ५ एप्रिल रोजी सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपली एकजूट दाखवावी, आणि रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईट नऊ मिनिटांसाठी बंद ठेवून दिव्याच्या प्रकाशात भारतमातेचे स्मरण करावे, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, 22 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी थाळी, घंटी, ताट, टाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, अनेक जण गर्दी कतर ताट, टाळ्या वाजविल्या. तसेच नागरिकांनी गर्दी देखील केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!