🕒 1 min read
मुंबई: दादर येथील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासाठी इटलीमधून दिवे मागवण्यात आले होते. आता यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत.आता हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केला आहे.
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 19, 2021
दरम्यान मुख्यमंत्री निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. प्रामुख्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
