Share

‘मानवतेच्या दृष्टीने विचार करुन रेल्वेने परराज्यातील मजूर, कामगारांकडून तिकीट शुल्क आकारु नये’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :- कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत. मात्र याच दरम्यान परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वे तिकीट आकारु नये, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.

‘काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरुन या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले, तर या काळात त्यांना आधार मिळेल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून करोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!