Share

राज्यपालांच्या बैठकीला पाठ फिरवून CM ठाकरेंनी दिला दणका !

Published On: 

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या संसार्गावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून याबाबत माहिती दिली. विरोधी पक्ष वारंवार तक्रार घेऊन येत असल्याने अखेर राज्यपालांनी एका बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्र्यांना देखील आमंत्रण दिले. मात्र उद्धव ठाकरेंनी या बैठकीत उपस्थित राहण्यास नकार दिला.

भाजपने राज्य सरकारच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार करत बैठक बोलावली. या बैठकीला भाजप शिष्टमंडळ व अधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आमंत्रण दिले. मात्र उद्धव ठाकरेंनी हे या बैठकीला उपस्थित राहण्यास ना पसंती दर्शवली. मात्र आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना या बैठकीला पाठवले. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून राज्यपालांना एक प्रकारचा दणकाचं दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित या बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर, प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांना काही सूचना दिल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!