टीम महाराष्ट्र देशा : तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर मग जॉबचं पण त्यांनाच विचारा. मला काय विचारता, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले होते.
वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात अधिकारी आंदोलन करत होते. त्यावेळी, कुमारस्वामी हे बसने कारेगुड्डा या गावाकडे जात होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या अधिकार्यांनी त्यांची बस अडवली आणि घोषणाबाजी केली.
इतकेच नव्हे तर, आंदोलन कर्त्यांनी कुमारस्वामींना रोजगाराबाबत प्रश्न विचारला, त्यावेळी कुमारस्वामींनी पंतप्रधानांकडे जाण्याचा सल्ला दिला, तसेच तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर मग जॉबचं पण त्यांनाच विचारा, असा सल्लाही दिला. तसेच मला काय विचारता असेही म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

