Share

राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरेंचे बोलवते धनी वेगळे असून त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून येते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईमध्ये भाजप महिला आघाडीकडून आयोजित मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात, त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्यांच्या तोंडून बोलवून घेतात, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे. ज्यांना एक नगरसेवकही निवडून आणता येत नाही, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी सुपारी घेतली असून पुढील काही दिवस ते असेच बोलणार असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

मनसेच्या वर्धापन दिनी शनिवारी आयोजित सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. राज ठाकरेंनी निवडणुकांच्या तोंडावर येत्या दोन तीन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, अशी शंका देखील व्यक्त केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!