Share

बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार, नगरमध्ये सिनेस्टाईल थरार

Published On: 

अहमदनगर : एका बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार केल्याचा सिनेस्टाईल थरार राहुरी तालुक्यात घडला आहे. गोळीबारात पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके सुदैवाने बचावले आहेत. याप्रकरणी आरोपी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गोळीबार करणारा पुण्यातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला धमकवण्यासाठी हा बडतर्फ पोलीस अधिकारी अहमदनगर जिल्ह्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि घटनास्थळी झालेल्या झटपटीत हा गोळीबार झाला.

सुनील लोखंडे हा पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता. मात्र त्याच्याविरोधात राहुरी येथील एका महिलेने बलात्काराची तक्रार केली होती. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. दरम्यान सुनील लोखंडे हा पीडितेवर दबाव टाकत होता. पीडितेने जबाब दिल्यास अडचणी वाढतील अशी भीती सुनील लोखंडे याला होती. त्यामुळे सुनील लोखंडे आज सकाळी पीडितेच्या घरात घुसला आणि जवळील पिस्तुल त्याने पीडित महिलेसह तीच्या दोन मुलींवर रोखले होते.

यादरम्यान माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे फौजफाट्यासह पीडितेच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दहशत निर्माण करण्यासाठी लोखंडे याने हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर चर्चेतून मार्ग काढू असे म्हणत पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन मुलींना त्याच्या तावडीतून सोडवले.

त्यानंतर डीवायएसपी मिटके यांनी लोखंडेच्या अंगावर झडप घातली तेव्हा लोखंडे याने मिटकेंवर गोळी झाडली. सुदैवाने गोळीची दिशा चुकल्याने मिटके यांचा जीव वाचला. याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!