मुंबई : मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ६८ महाविद्यालयीन मुलींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील भूजमध्ये हा प्रकार घडला असून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ” अतिशय धक्कादायक !! २१ व्या शतकातं वाटचाल करत असतांना आजही मासिक पाळी नाही हे सिद्ध करून दाखवायला विद्यार्थींनीची अशा अपमानकारकरित्या तपासणी करणं दुदैवी,चुकीचं व संतापजनक असल्याच सानागत संबंधीत संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भुजमधील एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळी सुरु आहे कि नाही हे तपासण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढण्यासाठी जबरदस्ती केली आहे. तर महाविद्यालय प्रशासनाने मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. हॉस्टेलच्या वॉर्डनने काही मुली मासिक पाळीत असताना हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात तसेच इतरांना स्पर्श करतात अशी तक्रार केली. नंतर काही मुलींना वॉशरूममध्ये त्वरित नेण्यात आले आणि त्या मासिक पाळीत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांचे अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यात आली.
मुलींकडून मासिक पाळी संदर्भात घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होतं असल्याच सांगत गुरुवारी (ता. १४) झालेल्या प्रकारानंतर 68 मुलींनी आंदोलन करत संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली. मात्र त्याहून धक्कादायक प्रकार म्हणजे महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा, असे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
