Share

‘मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी बहिणीच्या आरोपांवर गप्प का?’

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मुंडेंवर निशाणा साधला आहे. ‘तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तर, ‘धनंजय मुंडे यांच्यावर मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं त्यांना शिक्षा व्हावी, तसंच पोलिसांनीही या प्रकरणाची कसून तपासणी करावी. कितीही मोठा नेता असु द्या… दोषींना पाठीशी घालू नका.. जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहिजे तसंच अशा मोठ्या घटनांमध्ये पीडिता व तिच्या कुटुंबियांवर दडपण निर्माण केलं जाऊ शकत. पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते,’ असं म्हणत त्यांनी योग्य तपासणीची मागणी केली आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!