Share

‘तुमचे दात जास्तच दिसताहेत; कधी घशात जातील याचा नेम नाही’

Published On: 

🕒 1 min read

पुणे – माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात जोरदार ट्वीट वॉर रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना `साहेब या विकृती आपल्या पक्षाचे संस्कार दाखवतात. का येथेही क्लिन चीट देणार?’ असा प्रश्न केला. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र सोडताना त्यांनी `चित्रा वाघ आपण शांत का? खायचे दात एक अन् दाखवायचे दात एक…’ असे ट्विट केले आहे.

चाकणकर यांना कडक उत्तर देताना चित्रा वाघ यांनी चांगलंच झापलं आहे. वाघ यांनी चाकणकर यांना दात सांभाळून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. वाघ यांनी म्हटले आहे, की ज्याने गुन्हा केला असेल, त्याला त्याची शिक्षा मिळेलचं. नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही. चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही. पोलिस कारवाई करतीलच. तुमचे दात जास्तच दिसताहेत. ते सांभाळून ठेवा. कधी घशात जातील याचा नेम नाही.

दरम्यान,मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेनं नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तशी तक्रारही त्यांनी कोकण महानिरीक्षकांकडं केली होती. त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला होता. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात याप्रकरणातही शाब्दिक वाद पेटला होता. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर या बावळट आहेत, अशी टीका केली होती.

माध्यमांना त्या असही म्हणाल्या तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा. तसेच आपल्या मागणीनंतरच अवघ्या १० मिनिटांत पैसे जमा झाले आहेत. दोन दिवसांपासून सरकार फक्त घोषणा करत आहे. त्यांना खोटं बोलायला लाजही वाटत नाही ? असेही त्या म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!