Share

‘खोट्या बातम्या प्रसारित करण्यासाठी एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय संसजेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे.

इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. ‘संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काही मीडिया हाऊसेसनी पेगाससच्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही,’ असं फडणवीसांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!