Share

औरंगाबादेतील चिमुकल्यांच्या उपग्रहांनी घेतली अवकाशात झेप

Published On: 

औरंगाबाद : भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारा आयोजित, स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ साठी औरंगाबाद महानगरपालिकेतील शाळेच्या १०  विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह आज अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे अनेक नामांकित रेकॉर्ड्स बुक मध्ये याची नोंद घेण्यात आली आहे.

भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारा आयोजित, स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ साठी औरंगाबाद महानगरपालिकेतील शाळेच्या १० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यांनी तयार केलेले उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. हे सर्व लाईव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी मनपा प्रियदर्शिनी इंदिरा नगर या शाळेत लाईव्ह बघितले. त्यांनी बनवलेला उपग्रह अवकाशात झेप घेत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, रश्मी होंमुटे आणि सुरेखा महाजन यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स हे पाच प्रमाणपत्र कुरियर द्वारे मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!