Share

‘मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांना मासिक मानधन सुरु करावे’

Published On: 

पुणे : राज्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने समाजातील जवळपास सर्वच घटकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक उद्योग-व्यवसाय बुडाले असून खेळाडू,लोककला जपणारे कलावंत देखील मोठ्याप्रमाणात अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, लावणी, कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट,आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनामुळे नाट्यसृष्टीवरही अवकळा पसरली आहे. कलाकारांसोबतच नृत्यकलाकार, तंत्रज्ञ यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक नृत्य कलाकार आणि तंत्रज्ञांनी अन्य मार्गाचा अवलंब करत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला आहे.

कलाकार, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्ददर्शक, आणि तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सर्व कलाकार आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. त्यातच सुरश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही २०० गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप करत असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!