मुंबई : मिशन बिगिन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे. अस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगून मुंबई व शहरांतील हॉटेल्स कोरोना युद्धात सोबत आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स, लॉजेस सुरु करण्यापूर्वी काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दाखवला ‘ठाकरी’ हिसका
हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्वतःचं सरकार पाडायला जे गुण लागतात ते सगळे गुण संज्या कडे आहेत – निलेश राणे


