मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. आता अशीच तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून देखील येत असल्याची बातमी समोर आली आहे.
अजित पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वाची बैठक, आघाडीतील कुरबुरीवर चर्चा ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधी निर्णय प्रक्रियेत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती माहिती आहे.
त्यानंतर आता कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
चीन्यांचे धाबे दणाणले : पंतप्रधान मोदी कानोकान खबर न लागू देता थेट लेह मध्ये दाखल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे.

