🕒 1 min read
डेहराडून : देशामध्ये सध्या परतीच्या पाऊसाचा प्रवास चालू आहे. त्या दरम्यान अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. दरम्यान केरळ नंतर उत्तराखंड मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रुद्रप्रयाग सहित काही भागाचा हवाई दौरा केला. त्यामध्ये त्यांनी सगळी परिस्थिती समजावून घेतली त्यानुसार प्रशासनाने योग्य ती मदत जनतेला करावी असे सांगितले. दौरा करतांना उत्तराखंडचे आपत्ती निवारण मंत्री धन सिंग रावत तसेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते.
अतिवृष्टि से प्रभावित क्षेत्रों का हवाई सर्वेक्षण किया और रुद्रप्रयाग पहुंचकर आपदा से हुए नुकसान का जायजा लिया।
प्रशासन को निर्देश दिए हैं कि आपदा से प्रभावित लोगों की हर संभव मदद की जाए।
इस अवसर पर आपदा प्रबंधन मंत्री @drdhansinghuk जी एवं डीजीपी अशोक कुमार साथ रहे। pic.twitter.com/a1JNY5vOXj
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 19, 2021
या पाऊसात अनेक ठिकाणी घराचे मोठे नुकसान झाले असून नैनिताल मध्ये पाऊसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे चारधाम यात्रा पण थांबली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी राज्य सतर्क असल्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
