Share

महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला – छगन भुजबळ

Published On: 

नाशिक : लाडगाव (ता.औरंगाबाद) येथील छत्रपती लॉन्समध्ये शनिवारी (ता.पाच) ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन हे बाळासाहेब सानप यांनी केले होते. दरम्यान, या विभागीय बैठकीला बॅनरबाजीपासूनच ग्रहण लागले आहे. जालना महामार्गावर ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरवर आयोजक म्हणून नाव असलेले सानप यांचा ओबीसी नेते म्हणून उल्लेख करण्यात आला. याच वेळी यावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

दरम्यान, कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फक्त छायाचित्र छापण्यात येऊन त्यांचे नाव व पदाचा कुठलाही उल्लेख त्यावर करण्यात आला नव्हता. सोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणाचाही समजेन असा पत्ता दिला नसल्याने शनिवारी सकाळ पासुनच या कार्यक्रमाची उलट-सुलट चर्चा सुरू होती. यातच कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांचे भाषण सुरू असताना शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्या विषयी नकारात्मकता व्यक्त केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले.

यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी समाजात दोन गट पडल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर ओबीसी समाजात दोन गट नाहीत, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. तर पुण्यातील मोर्चात काही लोकांनी शरद पवार यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हावी, यातही त्याचाच पुढाकार आहे. पवार हे सत्यशोधक समाजाच्या कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना मदत करण्याचीच त्यांची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!