कोलकाता – देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे.
पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. ‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या.’ गोमूत्राची माहिती देताना घोष यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची विषाणूसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असंही दिलीप घोष यांचं म्हणणं आहे.
दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खासदार घोष एका बैठकीत असून तेथे ते घरगुती गोष्टींचा आरोग्यसाठी वापर समजावून सांगत आहे. ५५ वर्षीय घोष या व्हिडीओत म्हणतात की, ‘मी जर गायीबद्दल बोलायला लागलो तर अनेकजणांना ते पटणार नाही ते असहज होतील. गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गायीची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचं महत्त्व कसं काय लक्षात येईल.’
दिलीप घोष यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहे. ते नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गायीच्या दुधामध्ये सोनं असतं. त्यामुळेच ते सोनेरी दिसत असल्याचा दावा ही त्यांनी याआधी केला होता. तसेच देशी गायी आणि विदेशी गायींची त्यांनी तुलना केली. ‘विदेशी गाय नाही तर फक्त देशी गाय आपली आई आहे. ज्या लोकांची पत्नी विदेशी आहे. ते आता कठिण परिस्थितीत आहेत’ असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…
‘ठाकरे सरकारलाच कोरोना झालाय सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत’
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!

