Share

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुकीत बदल

Published On: 

पुणे: मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुक दि. 1 जानेवारी 2021 रोजी 00.01 पासून रात्री 24.00 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेकामी व प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पुणे ग्रामीण मधील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत मौजे पेरणे ता. हवेली येथे 1 जानेवारी 2021 रोजी जयस्तंभ कार्यक्रमाचे अनुषांगाने येथे दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 17.00 पासून ते दि. 1 जानेवारी 2021 रात्री 24.00 वा. पर्यंत जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातून व परराज्यातून नागरीक येत असतात. महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील परिपत्रकान्वये सदर अभिवादनाचा कार्यक्रम कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पदध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमारीता पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावरील वाहतूक दि. 1 जानेवारी 2021 रोजीच्या 00.01 पासून ते रात्री 24.00 वाजेपर्यंत खाजगी व सार्वजनिक वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यास पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी विनंती केलेली आहे.

वाहतुक बंद करण्यात येणारे मार्ग- चाकण,तळेगांव चौक- शेल पिंपळगांव-बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी. आळंदी-शेलपिंपळगाव -बहुळ-साबळेवाडी अशी दोन्ही बाजुकडील येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी. आळंदी-मरकळ-कोयाळी-शेलपिंपळगाव-बहुळ-साबळेवाडी दोन्ही बाजुकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात यावी.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 117 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन मौजे पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावारील वाहतुक दि. 1 जानेवारी 2021 रोजी 00.01 पासून रात्री 24.00 वाजेपर्यत पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेकामी व प्रवेश बंदी घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!