Share

चंद्रपूरातील ‘त्या’ पाॅझिटीव कुटुंबातील सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Published On: 

पवन झबाडे/चंद्रपूर : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्यात प्रवेश करण्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याला हादरविणारी घटना समोर आली. येथील कृष्णनगर परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रशासन सतर्क झाले.

दरम्यान या व्यक्तीची पत्नी, मुलगा आणि मुलीला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. या तिघांचेही नमुने घेण्यात आले. आज सकाळी मुलगी आणि पत्नीचा अहवाल आला. तो निगेटिव्ह होता. सायंकाळी उशिरा मुलाचा आला. तोही निगेटिव्ह निघाला.

या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ४० व्यक्तींची सूची तयार केली आहे. त्यांचेही नमुने तपासणी पाठविण्यात आले. त्यांच्या कुटुुंबीयांची तूर्तास कोरोनापासून सुटका झाल्याने प्रशासन आणि शहरवासींनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

दरम्यान कृष्णनगर, संजयन गर आणि दर्गा वॉर्डात संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. प्रशासन येथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत महानगर पालिकेचे पथक या संपुर्ण परीसराचे निरजंतुकिकरन करीत आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!