कोल्हापूर-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अक्षरशः उधवस्त झाल्यचे चित्र आहे. कुठे पाऊस नाही तर कुठे पेरलेले उगवले नाही कुठे खते मिळत नाहीत तर कुठे शेतीमालाला भाव नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे अनेक नेते तोंडाला चिकटपट्टी लावून बसल्याचे पाहायला मिळत आहे.
याच राज्यातील दूध दराच्या मुद्द्यावरून एका बाजूला रयतचे सदाभाऊ खोत सोमवारपासून राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारताना दिसणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विविध आंदोलने करणारे माजी खासदार राजू शेट्टी मात्र शांत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
सध्या राज्यात दुधाला २२ रुपये इतरा दर मिळत आहे. पण, या रकमेतून मूलभूत खर्चाची जुळवाजुळव करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नाही. शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये – गुलाबराव पाटील
‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – अजित पवार
‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’
‘आमच्या संपर्कातील भाजपच्या आमदारांची नावे बाहेर आली तर राज्यात भूकंप होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

