मुंबई : ‘क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगली व्यवस्था नाही. 5 रुपयात शिवभोजन म्हणता मग 50 रुपयात खिचडी? ती खिचडी दुपारी अडीच वाजता येते, आंबलेली असते. एवढं असूनही आम्ही बोलायचं नाही? असा सवाल उपस्थित करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
तसेच याबाबत बोलताना पाटील म्हणतात, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मला अपॉईंटन्मेट हवी आहे. मला अपॉईंटन्मेट मिळवून द्या. मुख्यमंत्री त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानातून बाहेर पडायलाच तयार नाहीत. ते विरोधीपक्ष नेत्यांची बैठकसुद्धा मातोश्रीत बसूनच घेतात,’ असा टोला पाटील यांनी लगावला.
दरम्यान, ‘राज्य सरकारकडून स्थलांतरितांची योग्य व्यवस्था केली गेला नाही. स्थलांतरितांना राज्यात थांबवण्यात सरकारला यश आलं नाही,’ असा आरोप पाटील यांनी ठाकरे सरकारवर लगावला.
‘गेल्या ६० दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी डबल पीपीई किट घालून घराबाहेर पडायला पाहिजे. दिवसातून ६ वेळा पीपीई किट बदलली तरी चालेल,’ असा सल्ला पाटील यांनी दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

