Share

#corona : मुंबई धोक्यात ! केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने व्यक्त केला धक्कादायक अंदाज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने मुंबईत बऱ्याचं जणांना विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत मुंबईत ५ हजार ४०७ जण हे कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या दोन दिवसात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी येणारे पुढचे काही दिवस अधूक जोखमीचे असणार आहेत. त्यात आता केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमने मुंबईबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. जर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर शहरात १५ मे पर्यंत ७५ हजार कोरोना रुग्ण आढळतील असे भाकीत असेसमेंट टीमने केले आहे.

केंद्र सरकारच्या असेसमेंट टीमच्या अंदाजानुसार, सध्या मुंबईत गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा दर ३.१ दिवस होता तर संपूर्ण देशात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर ९.१ दिवस होता. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याच्या संख्येच्या आधारावर केंद्रीय टीमच्या अंदाजानुसार ७५ हजार रुग्णांपैकी ६३ हजार रुग्ण विना लक्षण असतील तर १२ हजार रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येतील.

यासाठी आता मुंबई महापालिकेने हालचालींना सुरवात केली असून खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमधील बेडची क्षमता वाढवण्यास आणि इतर आरोग्य यंत्रणा उपलब्ध करण्यास युद्धपातळीवर सुरवात केली आहे. याबाबत रुग्णालयाशी संबंधित बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या विशेष प्रतिनियुक्त विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या की, दुप्पट होणाऱ्या रुग्णांची संख्या घटवणे हे महानगरपालिकेचे पहिले आव्हान आहे. कोरोना प्रकरणातील दुप्पट दर १० दिवसांचा असावा. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ४ ते ५ दिवसांपर्यंत पोहोचू नये हे महत्वाचे आहे. त्यासाठी मूलभूतपणे संपर्क ट्रेसिंग व लक्ष ठेवणे उपयुक्त ठरू शकते.

तसेच कंटेनमेंट झोनमध्ये डोर-टू-डोअर लक्ष ठेवलं जात आहे. तपासणीचे प्रमाण आणखी वाढविण्यात येईल असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. आम्हाला जितके पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील तितके विषाणूचा पराभव होण्याची शक्यता जास्त असते. आम्ही सध्या ताप आणि एकापेक्षा अधिक आजार असलेल्या वृद्धांवर लक्ष केंद्रित करत आहोत असं मनिषा म्हैसकर यांनी सांगितले.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!