टीम महाराष्ट्र देशा – लॉकडाऊन असलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू करण्यासाठी पंजाब सरकारने दारूची दुकाने सुरू व्हावीत यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. परंतू गृह मंत्रालयाने पंजाब सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे.
केंद्रिय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने उघडी ठेवण्याची पंजाब सरकारच्या विनंतीला लाल कंदिल दाखवला आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “पंजाब सरकारने दारूची दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतू सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून गृह मंत्रालयाने ही मागणी अमान्य केली आहे”.
गृह मंत्रालयाने १५ एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात दारू, गुटखा, तंबाखूवरील विक्रीवर कडत प्रतिबंध आणले आहेत. लॉकडाऊन काळात ही विक्री पूर्णपणे बंद राहील, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.
पंजाब सरकारने महसूल बुडत असल्याच्या कारणाने केंद्र सरकारने राज्याच्या काही भागात सोशल डीस्टन्सिंग पाळत दारू विक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती परंतु आता केंद्र सरकारने टी फेटाळून लावली आहे.
लॉकडाऊन काळात काही राज्यांचे मुख्यमंत्री दारू दुकाने उघडण्यासाठी परवानगी मागत आहेत. गुरूवारी महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महसूल सुरू होण्याकरिता राज्यातील दारू दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, असं म्हटलं आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

