🕒 1 min read
महाराष्ट्र देशा टीम : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. त्याच्यां सोबत आता त्याच्या पत्नी देखील पुढे येऊ लागल्या आहेत. किंग खान शाहरूख खानची पत्नी गौरी खाननेही तब्बल 95 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलीय. रोटी बँक फाऊंडेशन व मीर फाउंडेशनच्या सहकायाने ती मुंबईतील अनेक भागांमध्ये जेवण पूरवत आहे. याची माहिती तिने स्वत: हा तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक गरीब व रोजंदारी मजूरांची स्थिती गंभीर बनली आहे. कामधंदे ठप्प पडल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या मजुरांच्या किमान दोनवेळच्या जेवणाची तरी सोय व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोबत समाजातील काही मदतीचे हातही यासाठी पुढे आले आहेत. गौरी खान सध्या अशाच गरजुंसाठी काम करतेय. 95 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था तिने केली आहे.
शाहरूखनेही केलीही मोठी मदत :
अभिनेता शाहरूख खान आधीपासूनच मदतीसाठी पुढे सरसावला आहे. सीएम आणि पीएम फंडात त्याने आर्थिक मदत दिली. यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारला २५ हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) कीट त्याने पुरविल्या. इतकेच नाही तर हजारो लोकांना जेवण, असिड हल्ल्यातील पीडितांना किराणा मालाचीही मदत त्याने केली आहे. राजेश टोपे यांनी ट्वीट केलं होत, “शाहरुख खानने २५ हजार पीपीई किट्सचे योगदान दिलंय त्याबद्दल त्यांचे आभार. यामुळे करोनाविरूद्ध लढायला मदत तर होईलच आणि सध्या आघाडीवर राहून काम करणाऱ्या वैद्यकीय टीमचं रक्षण होईल.”
Many thanks Mr. Shah Rukh Khan for your kind contribution of 25,000 PPE kits. This will go a long way in supporting our fight against COVID19 & protecting our frontline medical care team @iamsrk @MeerFoundation @CMOMaharashtra
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2020
राजेश टोपे यांच्या ट्वीटवर शाहरुख खाननेही प्रतिक्रिया दिली होती. “सर, या किट्ससाठी तुम्ही मदत केलीत त्यासाठी आभार. मानवजातीच्या सुरक्षेसाठी आपण सर्वजण एकत्र येऊन लढुयात. सेवा करण्याची संधी दिलीत याचा आनंद आहे. आपलं कुटुंब आणि टीम सुरक्षित आणि निरोगी रहो.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
