मुंबई : वाढदिवस म्हणजे सर्वांच्या आवडीचा प्रसंग. मात्र या आनंदाच्या क्षणावर विरजन ही पडू शकतो, कारण केक कापतांना केसांना आग ही लागू शकते. आपणास नक्कीच आश्चर्य वाटल असेल, मात्र नुकतच हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री निकोल रिचीला याचा अनुभव आला आहे.
निकोलने वाढदिवशी काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होत्या. वर केस मोकळे ठेवले होते. निकोल केक कापण्यापूर्वी मेणबत्ती विझवण्याकरता फुंकर मारण्यासाठी थोडं खाली वाकते. तेवढ्यात तिच्या मोकळ्या केसांना आग लागते. लगेच तिची मैत्रीण ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. तिचा हा व्हिडीओ स्वत: निकोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CUGoiAQJe-5/
नुकताच तिचा ४०वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होतेअभिनेत्रीने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘ही मुलगी आग लावून टाकेल’ असे म्हटले होते. तर दुसऱ्या एका यूजरने आता पुढच्या कोणत्याच वाढदिवशी ही मेणबत्ती विझवणार नाही. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.’द सिंपल लाइफ’ या शोमुळे निकोल रिचीला लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने अनेक रिअलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर तिचे तिच्या खास मैत्रीणीसोबत वाद झाल्यामुळे ती चर्चेत होती. २००६मध्ये तिने लग्न केले. मात्र वाढदिवसाच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बेधूंद झालेल्या ‘धमेंद्र’ला तनुजाने दिला होता चांगलाच ‘चोप’
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

