Share

कोरोनामुळे वारकरी संप्रदाय चिंतेत, पालखीच्या नियोजनाबाबत शासनाने स्पष्टता द्यावी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोनामुळे सर्वच सांप्रदायिक कार्यक्रम रद्द करा व घरी बसूनचं चिंतन मनन करा असा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र आता राज्य सरकारने आषाढी वारीच्य नियोजनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे. महाराष्ट्रात अनेक संतांच्या पालख्या या आषाढी एकादशी निमित्त पायी चालत पंढरपूरकडे जात असतात. ही महाराष्ट्राची मोठी परंपरा असून यामध्ये अनेकजण सहभागी होतात.

मात्र यंदा कोरोनाचे जीवघेणे संकट असल्याने पालखीच्या नियोजनाबाबत शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी केली आहे. दरवर्षी महाराष्ट्राभरातून साधारणपणे 15 लाख वारकरी मजलदरमजल करत पंढरपूरमध्ये पोहोचतात. पण यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव पाहता पालखी सोहळ्याला इतकं भव्य दिव्य स्वरुप असू शकत नाही.

दरवर्षीप्रमाणे मुक्ताईंचा पालखी सोहळा प्रस्थानाची तारीख 27 मे आहे. ही तारीख आता अवघ्या 20-22 दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर माऊलींचा पालखी सोहळा 38 दिवसांवर आला आहे. पण अजूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पालखी सोहळ्याच्या प्रशासकांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असं रामभाऊ चोपदार यांनी म्हटलं.

तर देहूचे पालखी सोहळा उत्सव प्रमुख अभिजीत मोरे हे म्हणाले की, दरवर्षी प्रस्थान सोहळ्यात देहूमधून 330 दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. पण यावर्षीच्या संकटांची सगळ्यांना कल्पना आहे. आमच्याकडे काही दिंड्या कर कर्नाटकमधूनही येतात. अशा दिंडी प्रमुखांचे आम्हाला सातत्याने फोन येत आहेत. त्यांच्यकडून सात्यत्याने विचारणा होते आहे की आम्ही काय करायचं. पण आता शासनाच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वारकरी सहभाग घेत असतात. तर या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करतात. मात्र पुण्यातचं कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने हा पालखी सोहळा कसा पार पडणार यावर आता शंका निर्माण केली जात आहे. या दोन्ही पालख्या पुण्यात जिथे मुक्कामी असतात. तिथेच कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान याआधी पालखी सोहळा हा 1896 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा देखील ब्रिटिश सरकारने आषाढी आणि इतर पालखी सोहळे रद्द केले होते. यंदाचा धोका खूपच मोठा आहे. पंढरपूर परिसरात कोरोनाला अद्याप शिरकाव करता आलेला नसला तरी सोलापूर शहरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे. अशावेळी आषाढी यात्रेबाबत शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!