Share

आता गाडीवर ‘पोलीस’ लिहिता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  मुंबई हायकोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी लावता येणार नाही. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.

आपल्याला अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर ‘पोलीस’ अशी पाटी सर्रास पाहायला मिळते. परंतु अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो किंवा पाटी लावता येणार नाही. अशी पाटी दिसल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या ७ दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे.

दरम्यान, पोलिसांसह न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’ असं लिहिता येणार नाही. याबाबतही मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!