अंबाजोगाई (प्रतिनिधी) : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार आवश्यक ते बदल केले असून ताप रुग्णांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षाची व इतर सुविधांमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामधील रुग्णसेवेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना करीता एक नंबर ओपीडी चे प्रवेशद्वार हेच एकमेव प्रवेश द्वार राहील. याच प्रवेशव्दारावर तापेच्या रुग्णांची तपासणी करण्यात येवून त्यांना विशेष फिव्हर ओपीडी (स्वतंत्र ताप-कक्ष) येथे जावून संपुर्ण तपासणी करावी लागेल. रुग्णालयात
तातडीचे ऊपचार आवश्यक नसलेल्या कुटूंबनियोजन, हर्निया, मुतखडा, गाठ, मान पाठ-कंबरदुखी, मोतीबिंदू आदि शस्त्रक्रीया व आजारांवरील उपचारासाठी येण्याचे सध्या येणे टाळावे.रुग्णालयात सध्या फक्त तातडीचे ऊपचार,अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुर्ववत सुरु राहतील. रुग्णालयातुन देण्यात येणारे वयाचे प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र, वैद्यकीय मंडळ, वैद्यकीय बील आदी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
संभाव्य रुग्णांसाठी दोन स्वतंत्र कक्ष
बीड जिल्ह्यात अद्दाप कोरोना चा रुग्ण आढळुन आला नसला तरी इंडियन काँन्सिल आँफ मेडिकल रिसर्चस् (ICMR ) च्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागांतर्गत दोन स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी एक कक्ष हा रोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी तर दुसरा कक्ष हा बाधीत रुग्णांसाठी निर्माण करण्यात आला असुन या दोन्ही कक्षावर मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची नियंत्रण प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ही अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.
स्वाराती रुग्णालय व वैद्दकीय महाविद्यालयातील सुरु असलेल्या वैद्यकीय सेवेतील हे बदल केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या सुचनेप्रमाणे करण्यात आले असून रुग्णालयात उपचारा साठी येणाऱ्या रुग्णांनी अनावश्यक गर्दी टाळून कमी करुन कोरोना च्या संभावित प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सहकार्य करावे. कोरोना चा प्रसार रोखण्याकरीता जनतेने शासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. अफवा तसेच अनाठायी चिंतांना बळी पडू नये. असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.सुधिर देशमुख यांनी केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

