Share

राजकीय आरक्षण रद्द करा;प्रकाश आंबेडकरांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाबाबतची मोठी मागणी केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीला देण्यात येणारं राजकीय आरक्षण रद्दच करण्यात यावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

शिक्षण आणि नोकरीत दिलं जाणारं आरक्षण सर्वांना मिळावं यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही त्यांना आधी आरक्षणाचा लाभ मिळावा आणि ज्यांना यापूर्वी लाभ मिळालाय त्यांना नंतर आरक्षण मिळावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ शेवटी मिळावा, असं ते म्हणाले. आरक्षणाच्या यादीत कधीही आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव आधी असावे आणि ज्या कुटुंबाने पूर्वी आरक्षणाचा लाभ घेतला असेल त्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव शेवटी असावं, असं ते म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावं म्हणून हे आरक्षण ठेवण्यात आलं. मात्र, त्यानंतर १९५४मध्ये स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती. राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचं बाबासाहेब म्हणाले होते, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’

‘आमच्या संपर्कातील भाजपच्या आमदारांची नावे बाहेर आली तर राज्यात भूकंप होईल’

शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

एक परीक्षा आपले भविष्य ठरवत नाही, बारावीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!