मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनी महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी सारेगमप लिट्ल चम्पमध्ये होस्ट म्हणून दिसणार मृण्मयी देशपांडे
- पुणेकर ऋतुराज गायकवाडला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी!
- रितेश- जेनेलिया देशमुखची कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; शिखर धवन असणार कर्णधार तर उपकर्णधार असणार…
- ‘या’ स्टार गोलंदाजाचा क्रिकेटमधून बाहेर जाण्याचा निर्णय ; क्रिकेट विश्वात उडाली खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

