Share

आनंदाची बातमी : शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार आहे. मोदी सरकारनं आजच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला आहे. १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत सरकारनं निश्चित केली आहे. कोरोना संकट काळातही शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं. अडचणीच्या काळातही शेतकरी थांबला नाही, अशा शब्दांत कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बळीराजाच्या कामाचं कौतुक केलं. १४ खरीप पिकांसाठीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा ५० ते ८३ टक्के अधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती तोमर यांनी दिली.

राजू शेट्टींचा शरद पवारांकडे अभ्यास सुरू आहे – सदाभाऊ खोत

कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचं तोमर यांनी सांगितलं. ‘मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं तोमर म्हणाले.

अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी त्यांना कालावधी वाढवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करता येईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. कोरोना संकटातही शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन केलं. यापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू, १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकारनं खरेदी केली आहे, असं तोमर यांनी सांगितलं.

‘ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्रभर आर्सेनिक अल्बम – ३० औषध मोफत पुरविणार’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!