🕒 1 min read
विवेक पोटफोडे : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत. एका बाजूला ही सर्व बिकट परिस्थिती असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना सामोश्याचा आस्वाद पंतप्रधान मोदी यांच्यासह घेण्याची इच्छा आहे.
ग्रामविकास विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक अल्बम – ३० हे होमिओपॅथिक औषध मोफत पुरवणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केलेय. कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम – ३० हे औषध मानवी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करते आणि ती वाढवते. राज्य सरकारच्यावतीने या औषधाच्या वाटपासाठी केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरीही मिळाली आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या औषधाचे वाटप केले जाणार आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
सध्या राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यभरातील जिल्हानिहाय ग्रामपंचायती, कुटुंबांची संख्या व नागरिकांची आकडेवारी संकलित करण्याचे काम मोठ्या जलद गतीने सुरू आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या गावागावात व प्रत्येक घरातील प्रत्येक माणसापर्यंत औषध पोहोचवले जाईल, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी ‘दिवे’ लावण्याचा कार्यक्रम मागे घ्यावा – हसन मुश्रीफ
समरजीत घाटगेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला :- हसन मुश्रीफ
अपमानाचे उत्तर कोल्हापूरकर दिल्याशिवाय राहणार नाहीत – हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
